

kerala bus viral video
esakal
तिरुअनंतपुरम/कोझिकोड: केरळमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महिलेने बस प्रवासादरम्यान झालेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केला, ज्याने मोठा गदारोळ उडवून दिला. या व्हिडिओच्या प्रसारानंतर, कोझिकोड भागातील ४१ वर्षीय दीपक नावाच्या पुरुषाने आपला जीव संपवला. दीपकच्या कुटुंबीयांनी या महिलेवर जीवन संपवण्यास भाग पाडल्याचा थेट आरोप केला आहे.