Gujarat News : गुजरात किनाऱ्यावर ३ हजार किलो ड्रग्ज जप्त; पाच परकीय नागरिकांना अटक

Gujarat News : गुजरात किनाऱ्यावर ३ हजार किलो ड्रग्ज जप्त; पाच परकीय नागरिकांना अटक

नवी दिल्लीः भारतीय सुरक्षा दले आणि अमली पदार्थविरोधी तपास संस्थांनी बुधवारी गुजरातच्या किनाऱ्यावर अरबी समुद्रामध्ये मोठी कारवाई करताना एका बोटीमधून ३ हजार ३०० किलोग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच परकी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. भारतीय नौदल, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ही कारवाई म्हणजे ऐतिहासिक यश असून यातून देशाला अमली पदार्थमुक्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार दिसून येतो, असे त्यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवरच नौदलाने ही कारवाई केली असून दीर्घपल्ल्याचे टेहेळणी विमान, युद्धनौका आणि हेलिकॉप्टर देखील यात सहभागी झाले होते. नौदलाच्या गस्ती पथकाला एका छोट्या जहाजाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर ते तातडीने ताब्यात घेण्यात आले. या जहाजावर तब्बल ३ हजार ३०० किलोग्रॅम वजनाचे अमली पदार्थ आढळून आले. ( यात ३,०८९ किलोग्रॅमचा चरस, १५८ किलोग्रॅम मेथामफेथामाईन आणि २५ किलोग्रॅम मॉर्फिन आदींचा समावेश आहे.) परदेशातून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ देशात आणले जात असल्याची माहिती आधीच गुप्तचर संस्थांच्या हाती लागली होती, त्याला अनुसरूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

Gujarat News : गुजरात किनाऱ्यावर ३ हजार किलो ड्रग्ज जप्त; पाच परकीय नागरिकांना अटक
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना 'लता दिनानाथ मंगेशकर' पुरस्कार प्रदान; रणदीप हुड्डा यांचाही सन्मान

इराणी अन् पाकिस्तानी नागरिक

‘एनसीबी’ने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध तपास संस्था आणि यंत्रणांनी अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश केला असल्याचे म्हटले आहे. परदेशातून देशात येणारे एवढ्या प्रमाणातील ड्रग्ज हे जप्त केले जाण्याची पहिलीच वेळ आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले पाचजण हे इराणी किंवा पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या नागरिकांकडे त्यांचे नागरिकत्व दर्शविणारे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. तसेच जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील नेमकी किंमत किती आहे? हे देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक किलोग्रॅम चरसची किंमत ही सात कोटी रुपये एवढी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com