
अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि तटरक्षक दलाने आज संयुक्त मोहीम राबवित तस्करांनी अरबी समुद्रात तळाशी फेकलेला अमलीपदार्थांचा तीनशे किलोचा साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १८०० कोटी रुपये इतकी आहे. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही दलांचे कौतुक केले आहे.