
Anas Hajas Died In Road Accident : कन्याकुमारीहून काश्मीरला स्केट बोर्डवर निघालेल्या तरूणाला ट्रकने चिरडून झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. काल हरियाणातील पंचकुला येथे हा अपघात घडला. अनस हजस असे या तरुणाचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर जखमी तरूणाला जवळील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घडलेल्या या अपघाताच्या वृत्तानंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, अनस हा त्याच्या स्केटबोर्डवरून कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत होता. त्यावेळी पंचकुलातील पिंजोरहून हिमाचल प्रदेशातील नालागड येथे जात असताना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अनसला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला नागरिकांनी जवळच्या कालका शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर ट्रक चालक फरार
अनस त्याच्या स्केटबोर्डवरून जात असताना एका ट्रकने त्याला मागून धडक दिली यात अनस गंभीर जखमी झाला घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, काही स्थानिक लोकांनी ट्रकचा क्रमांक नोंदवला आहे. त्यानुसार कलम 304A आणि 279 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल असे पिंजोर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी राम करण यांनी सांगितले.
कोण आहे अनस हजस?
31 वर्षीय अनस केरळमधील तिरुवनंतपुरममधील वेंजारामूडू येथील रहिवासी होता. हाजसच्या आईचे नाव शैला बीवी असे आहे. वडील अलियारकुंजी सौदी अरेबियात काम करतात. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर अनसने तिरुअनंतपुरममधील टेक्नोपार्क येथील आयटी फर्ममध्ये प्रवेश घेतला. तीन वर्षांपूर्वी अनसने स्केटिंग बोर्ड विकत घेऊन प्रशिक्षण सुरू केले होते.
स्केटबोर्डवर जाणार होता कंबोडियाला
स्केटिंगबाबत जनजागृती करण्यासाठी हजने लांब पल्ल्याची मोहीम सुरू केली होती. यामध्ये अनसच्या आई-वडिलांचाही पूर्ण पाठिंबा होता. कन्याकुमारी-काश्मीर प्रवास पूर्ण केल्यानंतर त्याने स्केटबोर्डवर भूतान, नेपाळ आणि कंबोडियाला जाण्याचा बेत आखला होता. हाजसने प्रवास सुरू करण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांनाही याबाबत माहिती दिली होती.
'सर्व सुरक्षित, धन्यवाद'
29 मे रोजी कन्याकुमारी ते काश्मीर असा 3511 किमीचा प्रवास सुरू झाल्यानंतर 30 जुलै रोजी अनस हरियाणा-पंजाब सीमेवर पोहोचला होता. त्यावेळी त्याने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रवासाबद्दल अपडेट देताना “मी काश्मीरपासून फक्त 600 किमी दूर आहे. काश्मीरमध्ये पोहोचण्यासाठी आणखी 15 दिवस लागू शकतात. मी दिवसाला फक्त 40 ते 50 किमी स्केटिंग करत असल्याचे नमुद केले होते. तसेच आतापर्यंत सर्व काही सुरक्षित असून सर्वांचे आभार मानले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.