Amarnath Yatra Accident: यात्रेकरूंच्या बस एकमेकाला धडकल्या; रामबनमध्ये ३६ जण जखमी, अमरनाथ यात्रा पूर्ववत
Bus Accident: रामबन जिल्ह्यात अमरनाथ यात्रेतील पाच बस एकमेकांवर आदळल्याने ३६ यात्रेकरू जखमी झाले.ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला असून, काही वेळानंतर यात्रा पूर्ववत करण्यात आली.
रामबन/जम्मू : अमरनाथ यात्रेकरूंच्या पाच बस एकमेकाला धडकून झालेल्या अपघातात ३६ यात्रेकरू जखमी झाले आहेत. रामबन जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली. जम्मूच्या भगवती नगर येथून पहलगामकडे निघालेल्या या बसना अपघात झाला.