Breaking : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा त्याचजागी एन्काऊंटर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पहाटे तीन वाजता ही घटना घडली आहे. तेलंगाणाचे पोलीस महानिरिक्षक जितेंद्र यांनी ही माहिती दिली आहे.दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने या चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते, तेव्हा पळून जाण्य़ाचा प्रयत्न करताना त्यांचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहाटे तीन वाजता ही घटना घडली आहे. तेलंगाणाचे पोलीस महानिरिक्षक जितेंद्र यांनी ही माहिती दिली आहे.दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने या चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. 

हैदराबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या चटनपल्ली गावात ही घटना घडली आहे. या आरोपींना ज्या ठिकाणी 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार केला त्याचठिकाणी त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 

तिचं नाव पॉर्न साईटवर सर्च केलं गेलं तब्बल 80 लाख वेळा

एनएच-44 महामार्गावर एन्काऊंटर
बलात्काराचा गुन्हा नेमका कसा घडला? याचा तपास करण्यासाठी त्या घटनास्थळावर पोलिस आरोपींना घेऊन जातात. त्या तपासासाठीच एनएच-44 महामार्गावरील पुलाखाली आज पहाटे पोलिस चारही आरोपींनी घेऊन गेले होते. या पुलाखालीच संबंधित डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून, तिला जाळून मारण्यात आले होते. त्याठिकाणी तपासासाठी नेले असताना, चारही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. 

हैदराबादच्या प्रियांकाची निर्घृण हत्या

काय घडले होते त्या गुरुवारी?
हैदराबादमध्ये गेल्या गुरुवारी टोल नाक्यावर गाडी पार्क केलेल्या डॉक्टर तरुणीवर चारही आरोपींनी पाळत ठेवली होती. तिची गाडी त्या आरोपींनी पंक्चर केली होती. मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर चारही आरोपींनी बलात्कार केला होता. बलात्कारानंतर बेशुद्ध अवस्थेतील तरुणीला ते सोडून गेले होते. त्यानंतर पुन्हा ती शुद्धीवर आल्याचं लक्षात आल्यानंतर तिला जाळून ठार मारण्यात आलं होतं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही त्याचे पडसाद उमटले होते. आरोपींना जमावाच्या हाती द्यावं, अशी मागणी देशभरातून होत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 people who were charged in Hyderabad Rape case have been killed by Hyderabad Police