4 पैकी 2 मुद्द्यांवर सहमती; शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर कृषीमंत्र्यांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 December 2020

आज विज्ञान भवनमध्ये केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चेची सहावी फेरी पार पडली.

नवी दिल्ली- आज विज्ञान भवनमध्ये केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चेची सहावी फेरी पार पडली. बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधींनी 4 विषय चर्चेसाठी पुढे ठेवले होते, त्यातील 2 मुद्यावर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सहमती झाल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा 4 सप्टेंबरला चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

चर्चा चांगल्या वातावरणात घडून आली. सरकारने याआधीच स्पष्ट केलंय की एमएसपी यापुढेही सुरुच राहिल. आम्ही हे लिखित स्वरुपात देण्यासाठी तयार आहोत. शेतकरी संघटनांनी एमएसपीला कायदेशीर रुप देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा याबाबात चर्चा सुरु राहिल. शेतकऱ्यांसोबत 4 जानेवारीला दुपारी 2 वाजता चर्चा होईल, असं तोमर म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 points out of which 2 points have been agreed upon Agriculture Minister Narendra Singh Tomar