निवृत्त डॉक्टर येणार मदतीला, लष्कराकडून 400 अधिकाऱ्यांची भरती

doctors
doctorse sakal
Updated on
Summary

सेवानिवृत्त झालेले लष्करी वैद्यकीय तुकडीतील (एएमसी) ४०० वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमाल ११ महिन्यांच्या कालावधीच्या कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार आहे.

नवी दिल्ली : देशात हाहाकार माजलेल्या कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरी प्रशासनाला साहाय्य करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्ध करून देण्यास संरक्षण मंत्रालयाने पावले उचलली आहेत. आता लष्करी वैद्यकीय तुकडीतील (एएमसी) माजी अधिकारी आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील (एसएससी) सुमारे चारशे वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. (400 officers from the military medical unit will be recruited)

सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) महासंचालकांना यासंबंधी सूचना करण्यात आली आहे. ‘टूर ऑफ ड्यूटी’ योजनेअंतर्गत, २०१७ ते २०२१ दरम्यान सेवानिवृत्त झालेले लष्करी वैद्यकीय तुकडीतील (एएमसी) ४०० वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमाल ११ महिन्यांच्या कालावधीच्या कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्यावेळी असलेल्या वेतनातून मूळ निवृत्तीवेतनात वजावट करून एक निश्चित मासिक एक रकमी रक्कम प्रदान केली जाईल, तसेच आवश्यक तज्ज्ञ वेतन देण्यात येईल.

doctors
पश्‍चिम बंगालसारखा खेळ खेळू नका! अशोक चव्हाण यांचे विरोधकांना आवाहन

कराराच्या मुदतीत या रकमेत कोणताही बदल होणार नाही आणि कोणतेही अन्य भत्ते दिले जाणार नाहीत. भर्ती करण्यात येणारे वैद्यकीय अधिकारी नागरी मानकांनुसार तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. एएफएमएसने यापूर्वीच विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ, विशेषज्ञ आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त डॉक्टर तैनात केले आहेत, तर शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या डॉक्टरांच्या सेवेला ता. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे डॉक्टरांची संख्या २३८ ने वाढली आहे.

विनामूल्य ऑनलाइन सल्ला

देशातील सर्व नागरिकांना इ-संजीवनी ओपीडीवर विनामूल्य ऑनलाइन सल्ला देण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील माजी डॉक्टरांना घेतले आहे. इ-संजीवनीच्या संकेतस्थळावरून घेता येईल. निवृत्त सैनिक आणि त्यांच्यावरील अवलंबितांची देखभाल करण्यासाठी अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस) अंतर्गत जास्त भार असलेल्या ५१ सर्वरोग चिकित्सालयांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर तीन महिन्यांसाठी रात्रपाळीसाठी कामावर ठेवण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

(400 officers from the military medical unit will be recruited)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com