देशात पुन्हा ७५ हजार पार; अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही ८ लाखांवर

Corona-Virus
Corona-Virus

नवी दिल्ली : देशात पुन्हा काल (ता. ०२ ) एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७५ हजार पार गेला आहे. सलग पाच दिवस कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ७५ हजारांच्या पुढे गेल्यानंतर सोमवारी रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली होती. परंतु, काल (ता. ०१) मंगळवारी रुग्णांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही ८ लाखांवर गेली आहे. देशात आता एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ७ लाख ९९ हजार ६०९ एवढी झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशात आता एकूण रुग्णांची संख्या ही ३७ लाख ६६ हजार १८० एवढी झाली आहे. तर त्यापैकी आतापर्यंत एकूण २८ लाख ९९ हजार ५२२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामध्ये मागील २४ तासांत ६२ हजार १४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, देशात काल एका दिवसात एकूण १०२७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा हा आता ६६हजार ४६० झाला आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण ४.४ कोटी चाचण्या झाल्या आहेत. देशातील पॉजिटिव्हिटी रेट हा ८.५ टक्के एवढा आहे. देशातील रिकव्हरी रेट हा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सार्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा हा एकूण ८ लाख ८ हजार ३०६वर पोहोचला आहे. त्यापैकी ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात आता १ लाख ९८ हजार ५२३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात आतापर्यंत २४ हजार ९०३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

टॉप फाईव्ह कोरोनाबाधित राज्ये 
१) महाराष्ट्र - ०८ लाख ०८ हजार ३०६
२) आंध्रप्रदेश - ०४ लाख ४५ हजार १३९ 
३) तामिळनाडू - ०४ लाख ३३ हजार ९६९
४) कर्नाटक - ०३ लाख ५१ हजार ४८१ 
५) उत्तर प्रदेश - ०२ लाख ३५ हजार ७५७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com