सपा नेत्याच्या 26 वर्षीय मुलीला दोन मुलांचा बाप असणाऱ्या भाजप सरचिटणीसानं नेलं पळवून I BJP leader | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Leader Ashish Shukla

या कृत्यामुळं पक्षाची बदनामी झाल्यानं भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या भाजप नेत्याची हकालपट्टी केलीये.

BJP leader : सपा नेत्याच्या 26 वर्षीय मुलीला दोन मुलांचा बाप असणाऱ्या भाजप सरचिटणीसानं नेलं पळवून

हरदोई : यूपीच्या हरदोई जिल्ह्यात भाजप नेत्यावर (BJP leader) सपा नेत्याच्या मुलीचं अपहरण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सपा नेत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे.

भाजपचे शहर सरचिटणीस आशिष शुक्ला (Ashish Shukla) यांच्यावर 26 वर्षीय तरुणीचं अपहरण केल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळं पक्षाची बदनामी झाल्यानं भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी विवाहित आणि दोन मुलांचा बाप असलेल्या भाजप नेत्याची हकालपट्टी केलीये. हे संपूर्ण प्रकरण हरदोई शहरातील कोतवाली परिसरातील आहे.

हेही वाचा: Political News : अजितदादांवर आता शरद पवारांचाच विश्‍वास राहिला नाही; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

इथं भाजपचे 47 वर्षीय शहर सरचिटणीस आशिष शुक्ला यांच्यावर समाजवादी पक्षाच्या एका नेत्याच्या 26 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. सपा नेत्यानं (SP leader) पोलिसांकडं केलेल्या तक्रारीत म्हटलंय, 13 जानेवारी रोजी आशिष शुक्ला उर्फ ​​राजू शुक्ला यानं माझ्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं आहे.

हेही वाचा: Pathan Movie : 'पठाण'वरुन वाद सुरू असतानाच PM मोदींचं मोठं वक्तव्य; भाजपच्या नेत्यांना दिला 'हा' आदेश

आशिष शुक्ला आहे विवाहित

या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू असल्याची परिसरात चर्चा आहे. दरम्यान, सपा नेत्याच्या मुलीचं लग्नही निश्चित झालं होतं. मात्र, दोघंही पळून गेले. भाजप नेता शुक्ला विवाहित असून त्यांना 21 वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे.