Delhi Crime : हृदय पिळवटून टाकणारी घटना, मद्यधुंद तरूणांनी कामाहून परतणाऱ्या तरुणीला ८ किमी नेलं फरपटत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5 drunk boys car dragged girl 8 KM in their car girl death midst of new year celebrations in new delhi

Delhi Crime : हृदय पिळवटून टाकणारी घटना, मद्यधुंद तरूणांनी कामाहून परतणाऱ्या तरुणीला ८ किमी नेलं फरपटत

Delhi Crime News : जगभरात नव वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यादरम्यान दिल्लीमधूव एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री अपघातानंतर एका वाहनाखाली अडकलेल्या तरुणीला 7-8 किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. तसेच त्याच्या अंगावरून सर्व कपडे फाडले गेले. त्यानंतर मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: "आता आम्ही काय करायचं त्यांच्यावर…"; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर CM शिंदेचा सवाल

हे प्रकरण अपघाती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. डीसीपी ओटर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आऊटर दिल्लीच्या पोलिसांना पहाटे माहिती मिळाली होती की एका गाडील एक मृतदेह लटकत आहे, हे वाहन कुतुबगढच्या दिशेने जात आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि वाहनाचा शोध सुरू केला.

दरम्यान, कांझावाला परिसरात एका मुलीचा विवस्त्र मृतदेह रस्त्यावर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. क्राईम टीमला घटनास्थळी पाचारण करून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी कारचा शोध सुरू केला असता, कार सुलतानपुरी येथे बिघडलेल्या अवस्थेत आढळून आली.

हेही वाचा: Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपवर अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; 'दोन प्रौढ व्यक्ती…'

तसेच पोलिसांना अपघात झालेली स्कूटीही सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर स्कूटीवर जाणारी एक मुलगी कारच्या चाकात अडकली आणि तिला लांबपर्यंत फरपटत नेल्याचे आढळून आले.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक माहिती पोलिसांनी या प्रकरणाला अपघात असल्याचे म्हटले आहे. तपासात समोर आले की, अपघातानंतर मुलगी गाडीखाली फरपटत गेली, त्यामुळे तिचे कपडे फाटले.

हेही वाचा: Cobra Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या गोळ्या अन् नागराजाने गेमच केला

कामावरून घरी परतत होती मुलगी

आरोपी मुले मद्यधुंद अवस्थेत असताना सुलतानपुरीजवळ त्यांच्या घरी परतत होते. यादरम्यान त्यांची मुलीच्या स्कूटीला धडक बसली. यानंतर मुलगी गाडीखाली अडकली आणि आरोपी मुले तिला 7-8 किलोमीटरपर्यंत फरपटत घेऊन गेले.

कांझावाला येथील जोंटी गावाजवळ गाडीखाली मुलीचा मृतदेह अडकलेला पाहून रस्त्याने जाणाऱ्याने पोलिसांना फोन केला. एका खासगी समारंभात वेलकम गर्ल म्हणून काम करून ही मुलगी काल रात्री उशिरा घरी परतत असल्याची माहिती आहे. त्याच दरम्यान त्यांचा अपघात झाला. सध्या गाडी चालवणारा आरोपी अमितसह चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :crimedelhi