esakal | छत्तीसगडमधील चकमकीत पाच नक्षलवादी ठार, दोन जवान जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

5 naxalites killed in firing at Narayanpur Chhattisgarh

छत्तीसगडमधील चकमकीत पाच नक्षलवादी ठार, दोन जवान जखमी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रायपूर : सुरक्षा दल व नक्षलवाद्यांध्ये आज (ता. 24) झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. राज्यीतील नारायणपूर जिल्ह्यात ही चकमक झाली. डीआरजीचे दोन जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. 

नारायणपूर परिसरात अद्याप शोधकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार नारायणपूरमध्ये शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर देताना जवानांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात दोन जवान जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.  

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव येथे याआधी काही दिवसांपूर्वी चकमक झाली होती. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून त्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले होते. 

loading image
go to top