झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला; पाच पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जून 2019

- नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलिस कर्मचारी हुतात्मा.

जमशेदपूर : झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे आज (शुक्रवार) नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पाच पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. यातील पोलिस कर्मचारी सारायकेला परिसरात पेट्रोलिंगसाठी फिरत असताना सायंकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

सारायकेला परिसरात दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांना लुटून त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेतली. नक्षलवाद्यांनी केलेला हा हल्ला पश्चिम बंगाल-झारखंड सीमेवर झाला. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्ही सध्या घटनास्थळी पोहोचलो आहोत. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. 

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबार दास यांनी या घटनेचा निषेध केला असून, ते म्हणाले, पोलिसांनी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही. तसेच या सर्व नक्षलवाद्यांविरोधात कडक पावले उचलण्यात येतील.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Policemen Killed In Ambush By Maoists Near Jharkhands Jamshedpur