esakal | सत्ताधारी सत्ता राखणार की भाजप मुसंडी मारणार?
sakal

बोलून बातमी शोधा

5 states election

सत्ताधारी सत्ता राखणार की भाजप मुसंडी मारणार?

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: देशातील आज महत्त्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काही वेळातच येणार आहे. यामध्ये पश्चिम बंगालची लढाई केंद्राने पूर्ण दमाने लढली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमध्ये चांगलीच मुसंडी मारली होती. तसेच ममदादीदींनी या निवडणूक प्रचारात तब्बल १५० सभा घेतल्या होत्या तर मोदींनी २० सभा घेतल्या होत्या. तर गृहमंत्री अमित शहांनी ७० पेक्षा जास्त रॅल्या घेतल्या होत्या.

तर आसामची लढाईही मोठी गाजताना दिसली होती. कारण तिथले प्रचारातील मुद्दे दोन्ही पक्षांकडून जोरात मांडली गेली होती. आसाममध्ये प्रचारात एनआरसी, सीएए, चहा कामगारांचा प्रश्न, हिंदू-मुस्लिम प्रश्न, तसेच जमीन भाडेपट्टीचा मुद्दे गाजताना दिसले होते.

तामिळनाडूतही द्रमूकने सत्ता मिळवण्यासाठी प्रचारात चांगलीचा आघाडी घेतली होती. राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे ज्यामध्ये जयललिता आणि करुणानिधी यांच्या अनुपस्थितीत होत आहे. द्रमुकमध्ये स्टॅलिन यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत होते. तर अण्णा द्रमुक जयललिता यांच्या अनुपस्थितीत अंगातील सगळं बळ एकत्र करून लढताना दिसली होती.

केरळ राज्याचा इतिहास पाहिला तर तिथं अलटी-पलटी सरकार चालत आले आहे. पण यावेळेस सत्ताधारी पुन्हा सत्ता राखतील असा पोल आला आहे. तर पॉंडेचेरीत भाजपाला सत्ता हस्तगत करण्यास चांगले वातावरण आहे.

loading image
go to top