esakal | गॅस सिलिंडर किंमती ते नवीन एटीएम व्यवहार नियम; 1 मार्चपासून बदलणाऱ्या 5 गोष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

5 things that are changing from March 1

1 मार्चपासून नेमकं काय काय बदलणार आहे हे आपण सविस्तरपणे पाहू..

गॅस सिलिंडर किंमती ते नवीन एटीएम व्यवहार नियम; 1 मार्चपासून बदलणाऱ्या 5 गोष्टी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 1 मार्च म्हणजे सोमवारपासून अनेक नवे नियम अंमलात येणार आहेत. याचा मोठ्या प्रमाणात परिणाम देशातील सर्वसामान्य लोक आणि थेट त्यांच्या खिशावर पडणार आहे. 1 मार्चपासून नेमकं काय काय बदलणार आहे हे आपण सविस्तरपणे पाहू..

LPG गॅस सिलिंडर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विक्री करणाऱ्या कंपन्या Oil Marketing Companies घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करत असतात. पण, फेब्रुवारी महिन्यात जागतिक बाजारात वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे हे दर तीन वेळा वाढवण्यात आले. सध्या 14.2 Kg गॅस सिलिंडर देशाच्या राजधानीत 794 रुपयांना मिळत आहे. 

इंधनाचे दर

इंधनाचे दर दररोज बदलत असतात, पण जागतिक बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती ऐतिहासिक स्तरावर जाऊन पोहोचल्या आहेत. पण, हिवाळा संपल्यानंतर तेलाच्या किंमती कमी होतील, असे सुतोवाच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहेत. जागतिक पातळीवर तेलाची मागणी वाढली असल्याचं ते म्हणाले आहेत. 

एसबीआय ग्राहकांसाठी KYC अनिवार्य

1 मार्चपासून, एसबीआय ग्राहकांना KYC देणे गरजेचं असणार असणार आहे. असे न केल्यास त्यांचे अकाऊट निष्क्रिय केले जाऊ शकते. 

बँक एटीएमधून 2000 रुपयांची नोट काढता येणार नाही

1 मार्चपासून ग्राहकांना एटीएममधून 2 हजार रुपयांची नोट काढता येणार आहे. मात्र, त्यांना बँक काऊंटरवर 2 हजार रुपयांची नोट मिळू शकते. एटीएममधून 2 हजारांची नोट काढल्यानंतर ग्राहक बँकेत त्याचे सुट्टे मागण्यासाठी येत आहेत. याला आळा घालण्यासाठी एटीएममध्ये 2 हजाराच्या नोटा टाकण्यात येणार नाहीत.

FASTag खरेदीसाठी टोल प्लाझावर द्यावे लागणार पैसे

1 मार्चपासून टोल प्लाझावार FASTag मोफतमध्ये नसणार आहे. यासाठी गाडी धारकांना 100 रुपये मोजावे लागणार आहेत. 

loading image