धक्कादायक! काकासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

लखनौ : मुलाने आईला काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् स्वतःचा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या आईनं मुलाची हत्या केल्यानंतर त्याचं शीर बेडमध्ये लपवून ठेवलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलानं सावत्र आईला आपल्या काकासोबत विचित्र अवस्थेत पाहिलं. यामुळे त्याचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी तिनं मुलाला ठारच केलं. आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती कोणालाही कळू नये यासाठी तिनं त्याचं डोकं बेडमध्ये ठेवलं. पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या. पण मुलाचा काका फरार आहे.

5 वर्षांचा आयुष्मान आपले वडील आणि सावत्र आईसोबत राहत होता. सावत्र आईचं आयुष्मानसोबत वर्तन चांगलं नव्हतं. यामुळे दररोज कौटुंबिक कलह निर्माण होत होते. यादरम्यान, गुरुवारी आयुष्मान अचानक बेपत्ता झाला. घरातला लाडका मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानं कुटुंबीयांची धाकधुक वाढत होती. सर्वजण आयुष्मानचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता त्याच्या रुमपर्यंत पोहोचल्यानंतर घरातल्यानंतर मोठा धक्का बसला. येथे त्यांना शीर नसलेला आयुष्मानचा मृतदेह आढळून आला.

सावत्र आईच्या संशयास्पद हालचालींवरून कुटुंबीयांचा तिच्यावरील संशय वाढला. ज्या बेडमध्ये आयुष्मानचं शीर लपवून ठेवलं होतं, त्यावर त्याची आई बसून होती. हा बेड उघडून पाहताच कुटुंबीयांना रक्तानं माखलेलं अवघ्या पाच वर्षांच्या आयुष्यमानचं शीर त्यांना तेथे मिळालं. या घटनेची माहिती पोलिसांना तातडीनं देण्यात आली. पोलिस चौकशीदरम्यान आरोपी महिलेनं सांगितलं की, सावत्र मुलानं आपल्याला काकासोबत विचित्र अवस्थेत पाहिलं होतं. ही गोष्ट कुठेही बाहेर येऊ नये म्हणून मुलाची हत्या केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 year old saw stepmother and uncle in objectionable condition strangled to death