काश्‍मीर खोऱ्यात लवकरच मेगा भरती; 50 हजार जागा भरणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 August 2019

जम्मू- काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील निर्बंधांचे समर्थन करताना 370 वे कलम रद्द करण्यात आले असले तरीसुद्धा या भागाची संस्कृती आणि ओळख यांचे जतन केले जाईल अशी हमी राज्यातील जनतेला दिली.

श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील निर्बंधांचे समर्थन करताना 370 वे कलम रद्द करण्यात आले असले तरीसुद्धा या भागाची संस्कृती आणि ओळख यांचे जतन केले जाईल अशी हमी राज्यातील जनतेला दिली. पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यातील पन्नास हजार जागा भरल्या जातील अशी घोषणाही त्यांनी केली.

केंद्र सरकारने राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर आज आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या वेळी सल्लागार के. विजयकुमार, मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम आणि पोलिस महासंचालक दिलबाग सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

मलिक यांनी या वेळी आणखी काही दिवस दूरसंचार सेवेवरील निर्बंध कायम ठेवण्याचे सूतोवाच केले. राज्यातील दहशतवादी पाकिस्तानी नागरिकांकडून या सेवेचा अधिक वापर केला जात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50000 new govt jobs to be created in Jammu and Kashmir says Governor Satya Pal Malik