तमिळनाडूत मंदिराच्या खोदकामावेळी सापडले एवढं सोनं

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थिरुवनैकवल गावात जाम्बुकेश्वरर मंदिरासाठी खोदकाम सुरु असताना सोन्याची नाणी भरलेला हंडा सापडला. या हंड्यात तब्बल 505 सोन्याची नाणे आहेत.

चेन्नई : तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यात एका मंदिराच्या खोदकामावेळी सोन्याची नाणी भरलेला हंडा सापडल्याने परिसरात चर्चा सुरु आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थिरुवनैकवल गावात जाम्बुकेश्वरर मंदिरासाठी खोदकाम सुरु असताना सोन्याची नाणी भरलेला हंडा सापडला. या हंड्यात तब्बल 505 सोन्याची नाणे आहेत. यांचे वजन 1 किलो 716 ग्रॅम इतके आहे. या सोन्याच्या हंड्याबाबत चर्चा झाल्यानंतर गावकऱ्यांनी ही नाणी पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत.

नुकतेच उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे सोन्याच्या खाणी सापडल्याचे समोर आल्यानंतर देशभर चर्चा झाली होती. आता तमिळनाडूत सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांविषयी चर्चा होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 505 gold coins weighing 1.716 kg found in a vessel in Tiruchirappalli