esakal | ५५ वर्षीय महिलेला फरफटत जंगलात नेलं, अन् केला सामूहिक बलात्कार | Rape case
sakal

बोलून बातमी शोधा

Rape, Nagpur

५५ वर्षीय महिलेला फरफटत जंगलात नेलं, अन् केला सामूहिक बलात्कार

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: एका ५५ वर्षीय महिलेचं अपहरण (abduction) करुन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार (rape) केला. ग्रेटर नोएडा (Greater noida) जीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला. पीडीत महिला गवत कापणीसाठी शेतात गेली होती. त्यावेळी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती डीसीपी वृंदा शुक्ला यांनी दिली. एक आरोपी पीडीत महिलेच्या गावातील असून महिला त्याला आधीपासून ओळखत होती. अन्य तीन आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

पीडित महिला शेतामध्ये काम करत असताना, तिला ओढून जवळच्या जंगलात नेण्यात आलं. तिथे मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर महिलेने तात्कळ घर गाठलं व तिच्यासोबत घडलेल्या घटनेची कुटुंबीयांना माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: पोलिसाने केली पत्नीच्या प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे भरले गोणीत

त्यानंतर पीडीत महिलेने कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पीडीत महिलेला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं. पीडीत महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे डीसीपीने सांगितले. आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरु आहे. चारही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी टीम बनवली आहे.

loading image
go to top