Coronavirus : राहुल गांधींनी घेतली रघुराम राजन यांची मुलाखत; दिली अनेक प्रश्नांची उत्तरं

65000 Crores To Help Poor Raghuram Rajan To Rahul Gandhi On COVID 19
65000 Crores To Help Poor Raghuram Rajan To Rahul Gandhi On COVID 19

नवी दिल्ली : काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनसह अन्य समस्यांवर भाष्य केलं. शून्य संख्येवरच लॉकडाउन उघडला जाईल असं वाटत असेल तर ते अशक्य आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच, त्यांनी सद्यस्थितीत गरीबांची मदत करणं महत्त्वाचं असल्याचं सांगत यासाठी सरकारनं ६५ हजार कोटींचा निधी देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं.

जागतिक स्तरावर भारत एक मोठी भूमिका साकारू शकतो. नव्या वर्ल्ड ऑर्डरमध्ये भारत आपलं स्थान निर्माण करू शकतो. शक्तिहिन लोकांना शक्तिशाली नेता आवडतो. आपण विभागलेल्या समाजाच्या मदतीनं प्रगती करू शकत नाही. सद्यस्थितीत आरोग्य आणि नोकऱ्यांसाठी उत्तम व्यवस्था करणं आवश्यक आहे, असंही डॉ. रघुराम राजन यांनी सांगितलं. जागतिक अर्थव्यवस्थेत काही चुकीचं तर आहे. लोकांकडे नोकऱ्या नाहीत. ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे, निधीचंही असमान वितरण होत आहे. येत्या काळात आपल्याला संधीचंही समान वितरीत करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आतासारख्या घटना क्वचितच कोणाच्या फायद्याच्या ठरतात. परंतु आपले उद्योगधंदे जगापर्यंत पोहोचवण्याची भारताकडे उत्तम संधी आहे, असंही त्यांनी नमूद केलं. आपल्याला लवकरच अर्थव्यवस्थेचं चक्र पुन्हा सुरू करावं लाहेल. आपल्याकडे इतर देशांप्रमाणे भक्कम अर्थव्यवस्था नाही. सध्या जी माहिती समोर येत आहे ती चिंताजनक आहे. १० कोटी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असं सीएनआयईनं सांगितलं आहे. त्यासाठी आपल्याला उपाययोजनाही कराव्या लागणार असल्याचं राजन यांनी सांगितलं.

Coronavirus : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात

अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करायची असेल तर करोनाच्या चाचण्या वाढवण्याची अधिक आवश्यकता आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात एकत्र चाचण्या करायला हव्या. ज्यात आपल्याला १००० सॅम्पल्स घेऊन ते तपासायला हवे. अमेरिका आज दिवसाला लाखो चाचण्या करत आहे. परंतु आपण २० ते ३० हजार चाचण्याच करत आहोत, असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com