धक्कादायक ! गॅस गळतीमुळे ७ जणांचा मृत्यू तर, ५०००हून अधिकांची प्रकृती गंभीर

वृत्तसंस्था
Thursday, 7 May 2020

आंध्र प्रदेशातील के. आर. आर. व्यंकटपुरम गावात पॉलिमर औद्योगिक इमारतीत गॅस गळती झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे विशाखापट्टणम पूर्णपणे हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे या गॅस गळतीमुळे ०७ जणांचा मृत्यू झाला असून ५०००हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे.
 

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील के. आर. आर. व्यंकटपुरम गावात पॉलिमर औद्योगिक इमारतीत गॅस गळती झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे विशाखापट्टणम पूर्णपणे हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे या गॅस गळतीमुळे ०७ जणांचा मृत्यू झाला असून ५०००हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर २०० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा गॅस जवळपास ०३ किलोमीटरपर्यंत पसरत गेला. ०५ गावं पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत. या गॅस गळतीचा फटका ९ गावांना बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विषारी वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशम विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत.

दिलासादायक ! लॉकडाऊनमध्ये 'या' कार निर्माता कंपनीने घेतला मोठा निर्णय

पोलिसांनी या परिसरासोबत ५ गावं पूर्णपणे सील केला आहे. दरम्यान गॅस वेगानं पसरत असल्यानं ३ किलोमीटरपर्यंत परिसरात राहणाऱ्या लोकांना त्रास झाला आहे. ही गॅस गळती कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. कोरोनाचं संकट असताना आता गॅस गळतीच्या या दुर्घटनेमुळे विशाखापट्टणमला मोठा हादरा बसला आहे.

पंतप्रधान मोदींनी घटेनेबद्दल ट्विट केलं आहे. घटनास्थळाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले असून, गृहमंत्राल व एनडीएमआयशी यावर बोलणं झालं असल्याचंही ते म्हणाले. मी विशाखापट्टणममधील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणार्थ प्रार्थना करतो, ”असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 dead 2000 affected after gas leak at LG Polymers in Visakhapatnam