esakal | कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

7 Dead In Fire At Hotel Used As Covid Care Facility In Andhra

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे कोविड-१९ च्या रुग्णांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग लागली असून एकूण ०७ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

विजयवाडा : आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे कोविड-१९ च्या रुग्णांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग लागली असून एकूण ०७ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. विजयवाडामध्ये एका हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले होते. त्याला भीषण आग लागली असून पोलिसांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आज (ता. ०९) रविवारी सकाळच्या सुमारास ही आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ४० कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार चालू होते. यातील २० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून काही रुग्ण आतमध्येच अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाहेर काढलेल्या रुग्णांवर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या एनडीव्हीला दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एकूण १५ ते २०जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, यातील तीन रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी (०६ ऑगस्ट) अशीच एक गंभीर घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली होती. अहमदाबादमध्ये लागलेल्या आगीत एकूण ०८ जणांचा मृत्यू झाला होता. अहमदाबाद शहरातील नवरंगपुर भागातील श्रेय नावाच्या रुग्णालयाला ही आग लागली होती. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या ०५ पुरुष आणि ०३ महिलांचा यामध्ये मृत्यू झाला होता.

loading image
go to top