
नवी दिल्ली : संसदेमध्ये उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली असून यंदा महाराष्ट्रातील सात खासदारांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राइम पॉइंट फाउंडेशनकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडून संसदरत्न खासदारांची निवड करण्यात आली.