esakal | 74th independence day: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
sakal

बोलून बातमी शोधा

PM MODI

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदि मंत्री लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात उपस्थितीत आहेत.

74th independence day: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन सीमारेषेवर कुरापती करणाऱ्या चीनवर शाब्दिक तोफ डागली. सीमारेषेवर भारताच्या सामर्थ्याला आव्हान देण्यात आले. भारतीय लष्कराने याला जशास तसे उत्तर दिले. विस्तारवाद हा जगाला उद्धवस्त करणारा विचार आहे, अशा शब्दांचा वापर करत मोदींनी नाव न घेता चीनवर तोफ डागली. 'मेक इन इंडिया'चे रुपांतर हे मेक फॉर वर्ल्डमध्ये करु, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले. लाल किल्ल्यावर मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत यंदाचा स्वातंत्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदि मंत्री लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात उपस्थितीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी राज घाटावर जाऊन गांधीजींना वंदन केले. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असली तरी आत्मनिर्भर भारताचा संकल्प डगमगणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.  मोदींनी राष्ट्रीय डिजिटल मिशनची घोषणा देखील केली.   

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

- एनसीसीमध्ये 1/3 मुलींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असेल
-1 लाख एनसीसी कॅडेट तयार करणार
- सीमावर्तीत भागात एनसीसीच्या माध्यमातून लष्करी प्रशिक्षण सुरु करण्याचे प्रयत्नशील 
- अंदमान निकोबारसह लक्षद्विपपर्यंत इंटरनेट सेवा सुरु करण्याचे पर्यत्न करु 
-शांततेप्रमाणेच सैन्य सशक्तीकरणावरही भर
-लडाखमध्ये जे काही झाल ते जगानं पाहिलं आहे
-लडाखमध्ये जे काही झाल ते जगानं पाहिलं आहे
- भारतीय जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे
- सीमारेषेवर देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा प्रयत्न 
-शेजाऱ्यांसोबत विश्वास सामाजिक आणि सलोख्यानं 
 -राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनला सुरुवात
-जगभरातील कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत. मेक इन इंडियासोबत आपल्याला जगासाठी उत्पादन तयार करायचे आहे 
- जगातील देश एकमेकांवर अवलंबून आहेत. जगातील अर्थव्यवस्थेतेत भारताचे योगदना वाढवण्याचा संकल्प आपल्याला करायच्या आहेत. 
-कोरोनाची लढाई नक्की जिंकू असा विश्वास
-संकल्पाची महापूर्ती करायची आहे
- संकटकाळात शक्य तेवढी मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सक्षम
-देशातील तरुण आणि महिला शक्तींवर विश्वास
-देशातील जनतेमध्ये जिद्द पूर्ण करण्याची क्षमता
- आत्मनिर्भर शेतकऱ्यांमुळे आपण जगाला धान्य पुरवठा करु शकतो
-जागतिक अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी सक्षम बनने