कँसरने पीडित 85 वर्षीय रुग्ण आणि त्याच्या पत्नीने कोरोनावर केली मात

The 85-year-old cancer patient and his wife overcame Corona
The 85-year-old cancer patient and his wife overcame Corona

भूवनेश्वर- ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात कर्करोगाने पीडित असलेला 85 वर्षीय रुग्णांने आणि त्याच्या 78 वर्षीय पत्नीने कोरोना विषाणूवर मात केली आहे. ओडिशातील अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. केंद्रपाडाचे जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी सांगितलं की, सुरेंद्र पाल आणि त्यांच्या पत्नी सावित्री यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सुरेंद्र पाल यांना गळ्याचा कर्करोग होता. या दोघांनी कोरोनाला हरवल्याने अनेकांना प्रेरणा मिळेल. त्यांना शुभेच्छा. वर्मा यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

मोदी सरकारच्या भ्याडपणामुळे भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल- राहुल गांधी
केंद्रपाडाचे अतिरिक्त जिल्हा चिकित्सा अधिकारी एम एच बेग यांनी याबाबती अधिकची माहिती दिली. सुरेंद्र पाल यांना कीमोथेरेपीसाठी (कर्करोगासंबंधी उपचार) 8 जून रोजी कटक केंद्रीय कर्करोग केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी पत्नी सावित्री त्यांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात थांबल्या होत्या. दोघाचांही कोविड-19 अहवाल 29 जून रोजी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला. त्यामुळे या दाम्पत्याला कटकच्या एका कोविड-19 रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी उपचारादरम्यान विषाणूशी चांगल्या पद्धतीने लढा दिला. दोन दिवसांपूर्वी त्यांची चाचणी घेण्यात आली. यावेळी या दोघांचा अहवाल नकारात्मक (निगेटीव्ह) आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, असं बेग यांनी सांगितलं.

खरबदारी म्हणून सुरेंद्र आणि सावित्री यांना केंद्रपाडामधील बगडा ग्राम पंचायतीच्या कोविड-19 काळजी केंद्रात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना तेथूनही सोडण्यात आले आहे. त्यामुळे ते आता घरी गेले आहेत. या दाम्पत्याने आणि विशेष करुन 85 वर्षाच्या सुरेंद्र पाल यांनी कर्करोगाचा आजार असताना दृढनिश्चयाने आजाराशी सामना केला. कर्करोग झालेल्या रुग्णामध्ये प्रतिकारशक्तीचा अभाव असतो. असे असताना त्यांनी कोरोनावर मात केली आहे. या दाम्पत्याने स्पष्ट संदेश दिला आहे की कोरोनाला हरवले जाऊ शकते, असं एच एच बेग म्हणाले.

नेपाळ काही सुधरेना; भारतासोबत पुन्हा काढली खुसपट
दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दहा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. दररोज 30 हजाराहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 34956 नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.  अर्थात, रुग्णसंख्या वाढली असली तरी भारतातील रिकव्हरी रेट (कोरोना मुक्तीचा दर) 63.25 टक्के असून देश विजयाच्या जवळ असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. देशात आतापर्यंत 6,35,757 रुग्ण बरे झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com