

8th pay commission
esakal
नवी दिल्लीः आठव्या वेदन आयोगावरुन सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती फिटमेंट फॅक्टरवर. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात एकच प्रश्नय की, फिटमेंट फॅक्टर नेमका असेल किती? आणि वेतनामध्ये वाढ किती होईल? या मुद्द्यावर ऑल इंडिया एनपीएस कर्मचारी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मंजीत सिंह यांनी एका-एका मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली आहे. शिवाय यासंदर्भात उद्या एक बैठकही होऊ शकते.