
नवी दिल्ली: केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाची मुदत २०२४ मध्ये संपत असल्याने, आगामी वर्षात आठव्या वेतन आयोगाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. या आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल आणि 'फिटमेंट फॅक्टर' (Fitment Factor) म्हणजे काय, याविषयी सविस्तर माहिती घेऊया.