
नवी दिल्लीः सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या आशा ८व्या वेतन आयोगावर लागलेल्या आहेत. विशेषतः लेव्हल-६ (ग्रेड पे ₹४२००) मध्ये काम करणारे असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाचे कर्मचारी नवीन वेतनरचनेची वाट पाहत आहेत. सध्या या लेव्हलवरील कर्मचाऱ्यांची मूळ पगार रक्कम म्हणजेच बेसिक सैलरी ₹३५,४०० इतकी आहे. मात्र ८व्या वेतन आयोगाच्या चर्चांमुळे हा पगार किती वाढेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.