
62 वर्षाच्या महिलेने साडी नेसून सर केलं सर्वात उंच शिखर, पाहा व्हिडिओ
केरळमध्ये ६२ वर्षाच्या नागरतनम्माने (Nagaratnamma) सिद्ध केल आहे की, माणसामध्ये जर जिद्द आणि चिकाटी असेल तर तो कोणत्याही वयामध्ये काहीही करू शकतो. नागरतनम्मा यांनी साडी नेसून पश्चिम घाटातील सर्वात कठीण शिखरांपैकी एक अगसत्यकूडम (Agasthyarkoodam) आहे शिखर सर केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) नागरतनम्मा सहज रश्शीच्या सहाय्याने सहज डोंगर चढत आहे, तेही साडीमध्ये.
हेही वाचा: पुरूषांनो, रात्री विड्याचे पान खाल्ल्याने होतात ४ फायदे
४० वर्षांपासून सांभळत होत्या घराची जबाबदारी
अॅडव्हेंचर आणि हायकिंग गोष्टी नाही ज्या सर्वसाधारणपणे म्हाताऱ्या लोक सहभाग घेतात. एवढेच नव्हे तर शारीरिक दृष्ट्या फिट असूनही तुम्ही एखादयाकडून डोंगर चढण्याची किंवा ट्रेकिंगची अपेक्षा करू शकत नाही. नागरतनम्माने गैरसमज तोडून टाकले आहेत. इंस्टाग्राम पोस्ट केलेल्या कॅप्शननुसार, गेल्या 16 फेब्रुवारीला त्या आपला मुलगा आणि त्याच्या मित्रांसोबत रोप क्लाइंबिंग करण्यासाठी गेल्या होत्या. ही त्यांचा पहिला प्रवास होता. लग्नानंतर गेल्या 40 वर्षांपासून त्या संसारामध्ये बिझी होत्या कारण त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती.
हेही वाचा: Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या
आता करत आहे स्वप्न पूर्ण
कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ''त्यांची मुलं मोठी झाली आहेत. सर्वजण आपल्या आयुष्यात सेटल झाले आहेत. आता त्या आपली स्वप्न पूर्ण करत आहेत.'' पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, कोणीही त्यांच्या उत्साह आणि एनर्जीची बरोबरी कोणीही करू शकत नाही. ज्यांनी त्यांचा हा चढाईचा प्रवास पाहिला, सर्व त्याच्यासाठी प्रेरणादायी अनुभव होता.
अगरस्त्यरकूडमवर महिलांना जाण्यास मनाई आहे.
काही वर्षांपर्यंत तिरुवनंतपुरम येथे अगस्तरकूडमच्या डोंगरावर महिलांना जाण्याची अनुमती नव्हती. सुरक्षा लक्षात घेता स्थानिक गटाने १४ वर्षांपासून कमी वयाच्या मुलांना आणि मुलींना प्रतिबंधित करण्यात आले होते आहे. पण २०१८ साली नियमांमध्ये बदल केले आहेत. केरळ हायकोर्टाने निर्णय जाहीर केला की, ''लिंगानुसार प्रतिंबध लावले जाऊ नये. या निर्णयानंतर राज्याच्या वन विभागाने महिलांनी पर्वत रांगामध्ये जाण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली.''
हेही वाचा: प्रेग्नेंसीमध्ये Vitamin D का महत्त्वाचे? कमतरतेमुळे वाढू शकतो धोका
Web Title: A 62 Year Old Woman Wearing A Sari Complete The Highest Peak Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..