'जय हो कोरोना मैया'; देशात उभारलं कोरोना देवीचं मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'जय हो कोरोना मैया'; देशात उभारलं कोरोना देवीचं मंदिर

'जय हो कोरोना मैया'; देशात उभारलं कोरोना देवीचं मंदिर

sakal_logo
By
विनायक होगाडे

कोईमतूर : देशात वाढत्या कोरोनाच्या (Corona Crisis) पार्श्वभूमीवर चिंतेची परिस्थिती आहे. दररोज शेकडो मृत्यू होत असून आरोग्य यंत्रणेवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जीवाच्या काळजीपोटी अनेक लोक देवाचा धावा करत आहेत. भक्तीचा आसरा घेत लोक स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. याचंच एक उदाहरण सध्या तमिळनाडू राज्यातून पुढे येतंय. (A Temple For Corona Devi In Coimbatore Tamil Nadu)

हेही वाचा: आमची लस आमचा फोटो; मोदींचा चेहरा कशाला? ही राज्ये झाली आक्रमक

कोईमतूर जवळील इरुगुर येथे कोरोना देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे. कामाच्छीपुरी अधीनम मठाने कोरोना देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मंदिराचे प्रमुख शिवलिंगेश्वरार यांनी सांगितले की, प्लेग, साथीच्या रोगांपासून लोकांचे संरक्षण व्हावे म्हणून अशा मुर्ती तयार करण्याची मठाची परंपरा आहे. दीड फुटांची ही मुर्ती संगमरवराची आहे. आता ४८ दिवस आम्ही विशेष प्रार्थना करू. सांगतेच्या दिवसी महायज्ञही केला जाईल. त्यावेळी कोरोना निर्बंधांमुळे भाविकांना मात्र मंदिरात प्रवेश नसेल. तमिळनाडूत अशी अनेक मंदिरे आहेत. कोईमतूरमध्ये प्लेग मरीअम्मन मंदिर आहे.

तमिळनाडूमधील कोईमतूरमध्ये कोरोना देवी नावाची देवी स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाहाकारामध्ये हे मंदिर उभारण्यात आलं आहे. कामाचीपुरी अधिनम मठाकडून या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. प्लेग मरीअम्मन मंदिराप्रमाणेच हे मंदीर असणार आहे.

हेही वाचा: कोरोनात परदेशातून काय मदत मिळाली? केंद्राचा खुलासा

कोरोना देवी नावाच्या मुर्तीची देखील या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जवळपास 1.5 फूट उंचीची ही मुर्ती आहे. या देवीची दररोज आराधना करण्यात येत आहे. लोकांचा या महाभयावह विषाणूपासून जीव वाचावा असा धावा देवीला करण्यात येतो आहे. महासाथीच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात सध्या फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं देखील या मंदिरात पालन केलं जातं.

loading image
go to top