
मुंबई : ‘‘बाबा, मी लंडनला निघालोय. तिथे पोहोचल्यावर पुन्हा फोन करेन. तोवर काळजी घ्या...’’ हा शेवटचा संवाद होता अपघातग्रस्त एअर इंडियाचे वैमानिक सुमीत सभरवाल (वय ४४) यांचा. मुंबईच्या पवई परिसरात राहणाऱ्या सभरवाल यांनी विमान उड्डाणापूर्वी वडिलांशी फोनवरून संवाद साधला होता.