चर्चा तर होणारच! Swiggy आणि Zomato सीईओंमध्ये Tweet एक्सचेंज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tweet Exchange Between Swiggy and Zpmato CEOs
चर्चा तर होणारच! Swiggy आणि Zomato सीईओंमध्ये Tweet एक्सचेंज

चर्चा तर होणारच! Swiggy आणि Zomato सीईओंमध्ये Tweet एक्सचेंज

झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलीव्हरी अ‍ॅपच्या (Online food delivery app) माध्यमातून लोकांना प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील स्वादिष्ट पदार्थांची लज्जत घरबसल्या चाखता येणं शक्य झालं आहे. या क्षेत्रात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही कंपन्यासाठी नववर्षाची पुर्वसंध्या स्पेशल ठरली. या दिवशी या दोन्ही कंपन्यांच्या सीईओंनी (CEO) ट्विट एक्सचेंज केलं. या ट्विट एक्सचेंजची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

झोमॅटोचे CEO, दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) हे आधीपासूनच Twitter वर सक्रिय असतात, परंतु त्यांची प्रतिस्पर्धी Swiggy चे सीईओ श्रीहर्ष मॅजेटी क्वचितच ट्विटरवर सक्रिय असतात. तथापि, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, स्विगीचे सीईओ श्रीहर्ष मॅजेटी (Sriharsha Majety) यांनी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत स्विगीवरील NYE टीडबिट्स शेअर केल्या. त्यानंतर या दोन प्रतिस्पर्धी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या बॉसमध्ये ट्विटची देवाणघेवाण झाली.

हेही वाचा: मोदी म्हणजे Tiger of Hindutva; साध्वीचं ट्विट

ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या प्रकरणांमुळे 31 डिसेंबरच्या रात्रीच्या सेलिब्रेशनवर बऱ्याच अंशी निर्बंध आले. देशभरातील अनेक लोकांनी पार्टीला जाण्याऐवजी घरीच राहण्याचा आणि जेवण ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला. दीपंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला झोमॅटोवर दिल्या जाणाऱ्या ऑर्डर्सवरच्या अपडेट्स (Order Updates) ट्विटरवर (Twitter) शेअर केल्या. ३१ डिसेंबर रोजी एका दिवसात प्रथमच 2.5 दशलक्ष ऑर्डर आल्याचं त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना कळवले. लोकांनी काय ऑर्डर केले, त्यांनी डिलिव्हरी भागीदारांना कसे टिपले, विविध पेमेंट पद्धतींचा वापर कसा झाला आणि इतरही काही अपडेट्स त्यांनी शेअर केल्या.

दुसरीकडे, क्वचितच आपले ट्विटर अकाउंट वापरणारे श्रीहर्ष मॅजेती (Sriharsha Majety) हेसुद्धा ट्विटरवर नवीन वर्षाच्या आनंदात सामील झाले. त्यांनीही स्विगीवर NYE टिडबिट्स शेअर (share) करण्यासाठी आज माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचं निर्णय घेतल्याचं सांगितले.

हेही वाचा: Brain implant : न टाईप करता पहिल्यांदाच थेट मेंदूतून ट्विट

या दोघांच्या ट्विटनंतर पत्रकार चंद्रा श्रीकांत (Chandra Shrikant) यांनी याला "झोमॅटो विरुद्ध स्विगी" असं संबोधलं. "झोमॅटो विरुद्ध स्विगी! दीपंदर गोयल आणि श्रीहर्ष मॅजेटी होऊन जाऊ द्या! आज रात्री तुम्ही दोघे काय खात आहात?" असं ट्विट करून चंद्रा श्रीकांत यांनी दोन्ही सीईओंना टॅग केले. त्यानंतर मिस्टर मॅजेटी यांनी ही स्पर्धा योग्य नाही याकडे लक्ष वेधत आपण अजूनही शिकत असल्याचं सांगितले. प्रत्युत्तरादाखल, Zomato च्या CEO गोयल यांनी एक उत्साहवर्धक संदेश शेअर केला. "तुम्ही नक्कीच काहीतरी विशेष कराल! चला, हे करूया" या ट्विटनंतर मॅजेटी यांनीही त्याला GIF पाठवून रिप्लाय दिला.

स्विगी आणि झोमॅटोच्या सीईओंमधील या ट्विटला शेकडो 'लाइक्स' आणि कमेंट्स, मिळाल्या. गोयल यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीनुसार, जगभरातील लोकांनी भारतात त्यांच्या प्रियजनांसाठी जेवण ऑर्डर केले. 31 डिसेंबर रोजी झोमॅटोवर 91 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर देण्यात आल्या. दरम्यान, स्विगीने 31 डिसेंबरच्या रात्री 2 दशलक्ष ऑर्डर देखील पार केल्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :WarzomatoTwittertweet
loading image
go to top