100 रुपयांत करा आधार अपडेट; UIDAI ने जारी केली आवश्यक कागदपत्रांची यादी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

आधार कार्डवर असलेली माहिती अचूक आणि अपडेट असणं महत्वाचं आहे. यासाठीच आता UIDAI ने कार्डवरील माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीचा खर्च  (charge to update aadhar)याच्या डिटेल्स सांगितल्या आहेत.

नवी दिल्ली - देशात आधार कार्डचा वापर सध्या फक्त एक ओळखपत्र म्हणूनच नाही तर आपल्या पत्त्याचा पुरावा म्हणूनही केला जातो. याशिवाय अनेक महत्वाच्या कागदपत्रांसाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. पॅनकार्ड, मोबाइल, बँक खाते यासाठी आधार कार्डची गरज असते. अशावेळी आधार कार्डवर असलेली माहिती अचूक आणि अपडेट असणं महत्वाचं आहे. यासाठीच आता UIDAI ने कार्डवरील माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीचा खर्च  (charge to update aadhar)याच्या डिटेल्स सांगितल्या आहेत. तसंच आधार अपडेट करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता (documents need to update aadhar) आहे याची यादीच दिली आहे. 

UIDAI ने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये एक बदल करा किंवा अनेक बदल करा यासाठी तुम्हाला 100 रुपये शुल्क द्यावे लागेल. यामध्ये तुम्हाला बायोमेट्रिक अपडेटही करता येतं. मात्र तुम्ही फक्त डेमोग्राफिक डिटेल्स करणार असाल तर त्यासाठी केवळ 50 रुपये खर्च येईल.

आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे वैध कागदपत्रं असणं गरजेचं आहे. या कागदपत्रांच्या आधारे तुमचा पत्ता अपडेट केला जाईल. तसंच जन्म दिनांकही बदलता येईल. सध्या UIDAI ने 32 कागदपत्रांपैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून तर 45 कागदपत्रांपैकी एक पत्त्याच्या पुराव्यासाठी  वैध ठरवली आहेत. तर जन्म तारीख बदलण्यासाठी तुम्हाला UIDAI ने दिलेल्या यादीतील 15 कागदपत्रांपैकी एक द्यावे लागेल. कागदपत्रांची पूर्ण यादी आणि अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhaar Updation Cost Rs 100 UIDAI share document list

Tags
टॉपिकस
Topic Tags: