Gujarat Elections AAP Contest : आम आदमी पार्टीने 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यांनी काँग्रेसवर भाजपला मदत करण्याचा आरोप केला आहे आणि २०२७च्या गुजरात निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
अहमदाबाद,ता.३ (पीटीआय) : आम आदमी पक्ष (आप) विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडला असून पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज तशी घोषणा केली. काँग्रेस पक्ष हा गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपला मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.