
नवी दिल्ली : विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये दोन जागा जिंकल्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेल्या आम आदमी पक्षाला दिलासा मिळाला आहे. आम आदमी पक्षाने पंजाबच्या लुधियाना (पश्चिम) आणि गुजरातच्या विसावदर विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘आप’चे उमेदवार विजयी झाले. भाजप, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली.