Arvind Kejriwal : केजरीवालांचा जीव धोक्यात; ‘आप’ नेत्यांचा दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर आरोप
Delhi Police : आम आदमी पक्षाने आरोप केला आहे की केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला आहे. सुरक्षाव्यवस्था त्वरित पूर्ववत करण्याची मागणी पक्षाने केली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जीव धोक्यात असून त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून शुक्रवारी करण्यात आला.