Video: पक्षाने तिकीट न दिल्याने AAP नेता चढला मोबाईल टॉवरवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video: पक्षाने तिकीट न दिल्याने AAP नेता चढला मोबाईल टॉवरवर

दिल्ली : पक्षाने तिकीट न दिल्यामुळे आम आदमी पक्षाच्या नेत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. हा नेता मोबाईल टॉवरवर चढला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकासाठी तिकीट न दिल्यामुळे हा नेता टॉवरवर चढल्याची माहिती आहे.

दरम्यान, दिल्लीतील आपचे नगरसेवक हसीब उल हसन असं त्यांचं नाव असून त्यांना आगामी निवडणुकांत पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांनी थेट मोबाईल टॉवरवर चढून पक्षाचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी यावेळी असं सांगितलं की, "या प्रकरणात माझा मृत्यू झाला तर त्यासाठी आम आदमी पक्षाचे दुर्गेश पाठक, आतिशी हे जबाबदार असणार आहेत. कारण त्यांनी माझे मूळ कागदपत्र जमा करून घेतली आहेत. मला तिकीट मिळालं नाही तरी चालेल पण माझी कागदपत्र मला मिळाली पाहिजेत" असं हसन यावेळी म्हणाले.

त्याचबरोबर "माझ्याऐवजी त्यांनी दीपू चौधरीला 3 कोटी रुपयांना तिकीट विकलं, माझ्याकडेही पैशांची मागणी केली होती पण माझ्याकडे पैसे नव्हते" असा आरोपही त्यांनी केली आहे.

या घटनेनंतर त्यांना स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलांच्या जवानांकडून खाली उतरवण्यात आलं आहे. तर ते त्यांच्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.