
'अग्निवीर बनवत आहात की जातीवीर', आप खासदाराचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी अग्निपथ योजनेवरुन (Agneepath Scheme) केंद्र सरकारवर (Central Government) पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत. स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 'लष्कर भरती'मध्ये जात विचारली जात आहे, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केलाय.
संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "मोदी सरकारचा गरीब चेहरा आता देशासमोर आलाय. मोदीजी दलित/मागास/आदिवासींना सैन्य भरतीसाठी पात्र मानत नाहीत का? असा सवाल करत ते म्हणाले, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 'लष्कर भरती'मध्ये जात विचारली जात आहे. मोदीजी, तुम्ही देशात 'अग्निवीर बनवत आहात की जातीवीर', असा घणाघात त्यांनी केलाय. संजय सिंह यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, उमेदवाराकडं जात आणि धर्माचं प्रमाणपत्र मागण्यात आलंय.
हेही वाचा: धार्मिक यात्रांमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नको; CM योगींच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
संजय सिंह यांच्या आरोपांवर भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, 'विरोधकांना मोदीविरोधाची सवय झालीय. त्यामुळं ते असे आरोप करत सुटले आहेत.' जून महिन्यात सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना आणलीय. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना चार वर्षांसाठी अग्निवीर म्हणून संबोधलं जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर हे अग्निवीर आपापल्या क्षेत्रात करिअर करु शकतात. मात्र, या योजनेला प्रचंड विरोध होत आहे.
Web Title: Aap Leader Sanjay Singh Allegations On Modi Government Over Agneepath Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..