Manish Sisodia : तिहार जेलमध्ये दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांची पहिली रात्र; मिळाली १० बाय १५ ची कोठडी अन्…

Manish Sisodia
Manish Sisodia

दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam Case) अंमलबजावणी संचालनालयाची (ED) कारवाई सुरू आहे. दिल्लीतील मद्य धोरणाअंतर्गत कथित घोटाळ्यात सिसोदिया यांना कोर्टाने २० मार्च पर्यंतर न्यायालयिन कोठडी सुनावली आहे.

यानंतर सिसोदिया यांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची तुरुंगातील पहिली रात्र कशी गेली याबद्दल माहिती समोर आली आहे.

तिहार जेलमध्ये सिसोदिया १० बाय १५ स्क्वेअर फीट सिंगल सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जेल म्यनुअल नुसार त्यांना सर्व आवश्यक गोष्टी देण्यात आल्या. इतकेच नाही तर सिसोदिया यांना रात्रीच्या जेवणात रोटी, भात आणि बटाटा-मटरची भाजी हे जेवण देण्यात आलं होतं. आज तकने याबद्दलचे वृत्त दिलं आहे.

मनीष सिसोदिया यांना सीबीआयने मद्य धोरणात कथित घोटाळा प्रकरणी २६ फेब्रुवारीला अटक केली होती. यानंतर त्यांना सात दिवस सीबीयाय कोठडीत ठेवण्यात आलं. यानंतर सोमवारी त्यांना राउज एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.

सीबीआयने त्यांना न्यायालयिन कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य केली. कोर्टाने सिसोदिया यांना जेलमध्ये भगवद गीता, पेन आणि डायरी सोबत ठेवण्याची परवाणगी देखील दिली आहे.

Manish Sisodia
Sharad Pawar : औरंगजेब फोटो प्रकरणी चौघांवर गुन्हा; शरद पवार म्हणाले, तो फोटो औरंगजेबाचा कशावरून?

इतकेच नाही तर सिसोदिया यांच्यावतिने कोर्टात त्यांनी विपश्यना सेलमध्ये ठेवण्यात यावे अशी मागणी देखील केली होती. मात्र कोर्टाने जेल प्रशासन याबद्दलचा निर्णय घेईल असा निर्णय दिला.

सिसोदिया यांनी जेल नंबर १ मध्ये ठेवण्यात आलं आहे. सत्येंद्र जैन यांच्या कोठडीपासून ५०० मीटर अंतरावर आहे. जैन हे सध्या जेल नंबर ७ मध्ये आहेत. त्यांना मॅन्युअलनुसार आवश्यक वस्तू जसे की १ टूथपेस्ट, साबन,ब्रश देण्यात आलं आहे.

यासोबतच अंथरून-पाघरूण देखील देण्यात आलं आहे. जेलमध्ये मनीष सिसोदिया यांचं मेडिकल देखील करण्यात आलं. मंगळवारच्या दिवशी त्यांनी कुटुंबियांना देखील भेटता येणार आहे.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार मनीष सिसोदिया यांच्या कोठडीजवळ इतर आरोपी देखील बंद आहेत, जेल प्रशासनाने सिसोदिया यांच्या सुरक्षेची सर्वोतपरी काळजी घेतली जात असल्याचे म्हटले आहे.

Manish Sisodia
Raj Thackeray Video : आम्ही आजपर्यंत शिंदुदुर्गच ऐकतोय; राज ठाकरेंचा राणेंना मिश्कील टोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com