AAP Party : ‘आप’ आमदारांचा दिल्ली विधानसभेत गदारोळ
Delhi Politics : दिल्ली विधानसभेत ‘आप’ आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या प्रतिमा हटवण्याच्या विरोधात जोरदार गदारोळ घातला. नवीन भाजप सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात कामकाज ठप्प झाले.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री कार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे काढून टाकण्यात आल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत सोमवारी मोठा गदारोळ केला.