राम जन्मभूमी खरेदीत घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला

राम जन्मभूमी खरेदीत घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर तीर्थक्षेत्र विकास ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आणि जमिनीची किंमत २ कोटींवरून १८ कोटी २० लाखांपर्यंत वाढल्याचा आरोप झाल्यानंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. ज्यांनी हे सगळे प्रकरणा प्रामुख्याने चव्हाट्यावर आणले आहे, ते आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी त्यांच्या घरावर आज हल्ला झाला असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या घराच्या नेमप्लेटवर काळा रंग फासण्यात आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:चं आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. संजय सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, हल्लेखोरांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. हे हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. संजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच राम जन्मभूमी ट्रस्टच्या जमीन खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण सध्या चर्चेत आहे.

राम जन्मभूमी खरेदीत घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला
पश्चिम बंगालमध्ये भाजपात फूट; 24 आमदार तृणमूलच्या वाटेवर
राम जन्मभूमी खरेदीत घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या खासदाराच्या घरावर हल्ला
सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल PM मोदींनी जाणून घेतलं गडकरींचं मत

त्यांनी म्हटलंय की, जर सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तर मी या चोरांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझं घर राष्ट्रपतींच्या घरापासून काही अंतरावरच आहे. हा व्ही.आय.पी. परिसर आहे आणि याठिकाणी इतरही अनेक खासदार राहतात. आणि अशा ठिकाणी माझ्या घरावर हल्ला झाला आहे. संजय सिंह यांनी आरोप केलाय की, ज्या लोकांची अटक झाली आहे ते घरात घुसून माझ्यावर हल्ला करु इच्छित होते. मात्र, माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या हल्लेखोरांमध्ये चार-पाच लोक सामिल होते.

पुढे त्यांनी म्हटलंय की, काही दिवसांपूर्वीच त्यांना जाळून मारण्याची धमकी मिळाली होती. या ट्विटमध्ये त्यांनी असंही म्हटलंय की, कान उघडून लक्ष द्या भाजपवाल्यांनो. श्रीरामाच्या नावावर जेवढी गुंडगिरी करायची असेल तेवढी करा मात्र, मी मंदिरासाठीच्या पैशांमध्ये चोरी होऊ देणार नाही. मग भलेही त्यासाठी माझी हत्या झाली तरी चालेल.

काय आहे हे प्रकरण?

अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीवरून हा वाद उफाळला आहे. ही मुख्य मंदिराची जमीन नाही. मात्र येथे काही इतर मंदिरे उभी करण्याची परिषदेची योजना असल्याचे सांगितले जाते. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह तसेच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करताना त्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी किमतीची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केली, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तसेच कुसुम पाठक या महिलेकडून १८ मार्च २०२१ रोजी १८ कोटी २० लाख रुपयांना जमीन खरेदीच्या व्यवहाराची नोंद करणारे अयोध्येतील ‘बिल्डर’ सुलतान अन्सारी हे आज अयोध्येतील घरातून सहकुटुंब बाहेर निघून गेल्याने वेगळे वळण मिळाले. विश्व हिंदू परिषद या आरोपांची स्वतंत्र चौकशी करेल, असे सांगतानाच विहिंपचे महासचिव चंपत राय यांनी सारे आरोप राजकीय असल्याचे सांगून फेटाळले आहेत. भाजपने राम मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये अडथळे आणणाऱ्या विघ्नसंतोषी शक्तींकडून हे आरोप सुरू आहेत आणि ते निराधार आहेत, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकार याची चौकशी करेल, असे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com