Arvind Kejriwal : केजरीवालांना अटक, पुढे काय? सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होतील का? 'या' नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

AAP Arvind Kejriwal : भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकून राजकारणाच्या सारीपाटावर अवतीर्ण झालेल्या आम आदमी पार्टीच्या अव्वल तीन नेत्यांना कथित गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. यामुळे चळवळीतून उभी राहिलेला हा पक्ष पुन्हा ‘फिनिक्स’ पक्षासारखा उभा राहील की पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून जाईल, हा खरा प्रश्‍न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
Arvind Kejriwal arrest
Arvind Kejriwal arrestesakal

AAP Arvind Kejriwal : भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकून राजकारणाच्या सारीपाटावर अवतीर्ण झालेल्या आम आदमी पार्टीच्या अव्वल तीन नेत्यांना कथित गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले. यामुळे चळवळीतून उभी राहिलेला हा पक्ष पुन्हा ‘फिनिक्स’ पक्षासारखा उभा राहील की पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून जाईल, हा खरा प्रश्‍न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’चे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबल्याने आता प्रचाराची धुरा कुणी सांभाळायची व मुख्यमंत्रिपद किती दिवस तुरुंगातून चालविणार, तुरुंगातून राज्य हाकण्याला नायब राज्यपाल किती दिवस खपवून घेतील, हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर हा मतदार कायम राखणे हे मुख्य आता आपच्या नेत्यांपुढील कठीण आव्हान आहे. केजरीवाल यांना ‘पीएमएलए’अंतर्गत अटक करण्यात आली. या कायद्याअंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीला जामीन मिळणे तितकेसे सोपे नसते. त्यामुळे केजरीवाल किती काळ तुरुंगातून कारभार करतील, याबद्दल निश्चितपणे प्रश्नचिन्ह आहेत.

Arvind Kejriwal arrest
Madha Loksabha 2024 : माढ्यात मोहितेंची नाराजी भाजपला जड जाणार? काय आहे घराण्याचा इतिहास अन् सध्याची परिस्थिती?

आधीच विरोधात काम करणारे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना किती काळ तुरुंगातून त्यांना काम करू देतील. मुख्यमंत्री कार्यालयात बसलेल्या केजरीवाल यांच्यापुढे अडचणी निर्माण करणारे नायब राज्यपाल केजरीवालांना तुरुंगातून कारभार हाकू देतील, असे वाटत नाही. ‘आप’ हा राष्ट्रीय पक्ष आहे. दिल्ली, पंजाब, हरियाना व गुजरात राज्यात हा पक्ष निवडणूक लढवीत आहे. केजरीवाल हेच या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये प्रचाराची धुरा कोण सांभाळणार, हा प्रश्न कायम आहे. मुख्यमंत्री भगवंत मान पंजाबच्या बाहेर फार प्रभाव टाकू शकणार नाहीत. आता खासदार राघव चढ्ढा, मंत्री आतिशी मार्लेना व सौरभ भारद्वाज यांना हा धुरा सांभाळावी लागणार आहे.

केजरीवाल यांच्यानंतर कोण?

मुख्यमंत्रिपदी केजरीवाल नसतील तर कोण असेल हा प्रश्न आहे. ‘आप’मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले मनीष सिसोदियासुद्धा एक वर्षापासून तुरुंगात आहेत. आता ‘आप’च्या नेत्यांची फळी बघितली तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार राघव चढ्ढा, मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी मार्लेना व सौरभ भारद्वाज हे नेते समोर येतात. या सर्वांमध्ये सध्या राघव चढ्ढा हे या पक्षाचे नेतृत्व करू शकतात. परंतु मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाल्यापासून खासदार चढ्ढा फारसे रस्त्यावर दिसले नाही. आंदोलनाची सारी धुरा आतिशी मार्लेना व सौरभ भारद्वाज यांनी सांभाळली आहे. यामुळे खासदार चढ्ढा यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागू शकते.

‘आप’ला फोडण्यासाठी भाजप कदाचित राघव चढ्ढा यांचा शिडी म्हणून वापर करू शकते. मुख्यमंत्री भगवंत मान हे मूळचे ‘आप’चे नव्हेत. परंतु ते मुख्यमंत्री असले तरी दिल्लीतील आपचे नेते त्यांना नेता मानतील काय, हा प्रश्न कायम आहेच. आतिशी मार्लेना व सौरभ भारद्वाज हे केजरीवाल यांचे कट्टर निष्ठावान असले तरी सर्व आप आमदारांना त्यांचे नेतृत्व मान्य होण्याची शक्यता कमीच आहे.

Arvind Kejriwal arrest
IPL 2024 PBKS vs DC : खलीलने दिले होते टेन्शन मात्र लिव्हिंगस्टोनच्या षटकाराने पंजाबने उघडले विजयाचे खाते

सुनीता केजरीवाल हा पर्याय

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या मुख्यमंत्री होऊ शकतात काय, हा प्रश्न आता चर्चिला जात आहे. शनिवारी त्यांनी लोकांना संबोधन केले. केजरीवाल यांनी तुरुंगातून लोकांना लिहिलेले पत्र त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचून दाखविले. सुनीता केजरीवाल या उच्चशिक्षित आहेत. त्या सुद्धा सनदी अधिकारी होत्या. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सनदी सेवेचा राजीनामा दिला. पक्षात किंवा प्रशासकीय कामामध्ये त्यांनी कधीही दखल दिली नव्हती. त्यांचे नाव समोर आल्यास ‘आप’मधून विरोध होणार नाही. पक्षातील सर्व आमदार त्यांचे नेतृत्व स्वीकारतील, हा पर्याय ‘आप’साठी अधिक सोयीचा आणि विश्वसनीय वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com