Saurabh Bhardwaj: पंतप्रधानांच्या स्नानासाठी नकली नदी; आप नेते भारद्वाज, पूर्वांचलच्या लोकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप
PM Narendra Modi: आप नेते सौरभ भारद्वाज यांनी गंभीर आरोप केला आहे की, दिल्लीतील वझिराबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छट पूजेच्या स्नानासाठी ‘नकली यमुना नदी’ तयार केली जात आहे. दुसरीकडे, सामान्य पूर्वांचलवासीयांना मात्र दूषित पाण्यात स्नान करावे लागत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छट पूजा स्नानासाठी नकली यमुना नदी बनवली जात असल्याचा आरोप ‘आम आदमी पक्षा’चे(आप) नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.