
नवी दिल्ली : दिल्लीतील खासगी शाळांना भरमसाठ शुल्क वाढविण्याची मुभा देण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयावर आम आदमी पक्ष भडकली आहे. दिल्लीकरांना लुटण्याचा उघड भ्रष्टाचार सुरू झाला असून खासगी शाळांच्या शुल्कवाढीचा दिल्लीतील सरकारच्या मंत्र्यांशी काय संबंध आहे, याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.