
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचाच कालावधी बाकी राहिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा आम आदमी पक्षाचे(आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ‘आप’ने लोकसभेची निवडणूक काँग्रेससोबत लढवली होती तर त्यानंतर झालेल्या हरियाना विधानसभा निवडणुकीला दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सामोरे गेले होते.