

CJP's Abhijeet Dipke gets conditional bail
esakal
New Delhi: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिपके यांना ताब्यात घेतले होते. शांतता राखण्याचा बाँड त्यांना भरावा लागणार आहे, त्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याचे वृत्त आहे. जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जाणार नाही.