
गर्भपाताची गोळी खाल्ल्याने अल्पवयीन मुलीचा मृत्यू
नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये बोगस डॉक्टराकडून गर्भपाताच्या गोळ्या (Abortion Pill) घेतल्याने अल्पवयीन (वय १५) मुलीचा मृत्यू (Death) झाला. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगमजवळ ही घटना घडली. मुलीला गर्भवती करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. एस मुरुगन (२७) असे युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस मुरुगन हा दररोज मुलीला (Minor Girl) शाळेत सोडत होता. यादरम्यान दोघांमध्ये नाते निर्माण झाले. मुलगी नुकतीच गरोदर राहिली होती. मुलगी गरोदर राहिल्यानंतर मुरुगनने मित्राच्या मदतीने डॉक्टरकडून गर्भपाताच्या गोळ्या (Abortion Pill) घेतल्या होत्या.
हेही वाचा: पोलिसाने कोर्टात आणला बॉम्ब अन् झाला स्फोट; पोलिस जखमी
मुरुगनने मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने घरातून नेले आणि जाताना गर्भपाताची गोळी दिली. गोळी खाऊन दोघेही शाळेत जात होते. मुलगी अचानक बेशुद्ध पडली. घाईघाईत मुरुगनने मुलीला सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत (Death) घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिरुवन्नमलाई येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलीला गर्भपाताची गोळी देणाऱ्या डॉक्टरचाही पोलिस शोध घेत आहे.
Web Title: Abortion Pill Minor Girl Death Tamil Nadu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..