देशात मोदींची हवा कायम, राज्यात ठाकरेंची कामगिरीही समाधानकारक; जाणून घ्या जनतेचा मूड

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 16 January 2021

कोरोना विषाणू आणि शेतकरी आंदोलनासारखे ज्वलंत मुद्दे असतानाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. तरीही शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारला थोडे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- कोरोना विषाणू आणि शेतकरी आंदोलनासारखे ज्वलंत मुद्दे असतानाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. तरीही शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारला थोडे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. 'एबीपी न्यूज' आणि 'सी-व्होटर'च्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे मोदींच्या कामकाजावर समाधानी असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर केंद्र सरकारच्या कामाची पद्धत पसंत करणाऱ्यांच्या संख्येत लॉकडाऊनमध्ये 1 ते 11 जानेवारीमध्ये घसरण दिसून आली. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेतही भाजपचे मुख्यमंत्री मागे पडले आहेत आणि सर्वांत खराब कामगिरी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या टॉप 5 मध्ये भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे. 

जर देशात आता निवडणुका झाल्या तर कोणाचा विजय होईल असा प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला होता. यावर 58 टक्के लोकांनी एनडीएचे नाव घेतले. तर 28 टक्के लोकांनी यूपीए विजयी होईल असे म्हटले. 14 टक्के लोकांनी आता निवडणुका झाल्या तर तिसरी आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असे मत नोंदवले. 

हेही वाचा- कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय? कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या माहिती

देशात सर्वात वाईट कामगिरी असलेले 5 मुख्यमंत्री 

1. उत्तराखंड- त्रिवेंद्र सिंह रावत
2.हरियाणा- मनोहर लाल खट्टर
3.पंजाब- कॅप्टन अमरिंदर सिंह
4.तेलंगना- के चंद्रशेखर राव
5.तमिळनाडू- के पलानी सामी

सर्वात चांगली कामगिरी असलेले मुख्यमंत्री

टॉप 10
1. ओडिशा- नवीन पटनाईक
2. दिल्ली -अरविंद केजरीवाल
3. आंध्र प्रदेश- जगन मोहन रेड्डी
4. केरळ- पी विजयन
5. महाराष्ट्र- उद्धव ठाकरे
6. छत्तीसगढ़- भूपेश बघेल
7. पश्चिम बंगाल- ममता बॅनर्जी
8. मध्य प्रदेश- शिवराज सिंह चौहान
9. गोवा- प्रमोद सावंत
10. गुजरात- विजय रूपाणी

आता लोकसभा निवडणूक झाली तर कोण विजयी होईल ?
एनडीए – 58 %
यूपीए – 28 %
तिसरा आघाडी– 14%

हेही वाचा- मोटर वाहन कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे चाललेली वाहने भंगारात जाणार - नितीन गडकरी

केंद्राच्या कामकाजावर किती लोक खूश आहेत ?
खूश – 66%
नाखूश – 30%
सांगू शकत नाही – 4%

शेतकरी आंदोलनामुळे सरकारचे नुकसान होईल का ?
होय - 52%
नाही -34%
माहीत नाही -14%

भविष्यात पंतप्रधान मोदींचा पर्याय कोण असेल ?
राहुल गांधी -26%
अरविंद केजरीवाल-22%
ममता बॅनर्जी -8%
यापैकी कोणीही नाही - 44%

गृहमंत्री अमित शहांच्या कामगिरीवर समाधानी आहात काय ?
संतुष्ट-58 %
असंतुष्ट-28 %
कह नहीं सकते- 14%

राहुल गांधींच्या कामगिरीवर किती लोक खूश आहेत ?
खूश – 39%
नाखूश -44%
सांगता येत नाही- 17%

राहुल आणि प्रियंका पैकी कोणी काँग्रेस अध्यक्ष व्हायला हवे ?
राहुल-32%
प्रियंका-35%
दोन्ही नाही-33%
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abp news c voters survey pm narendra modi still popular despite of coronavirus farmer protest uddhav thackeray