
Amit Shah Announces the Liberation of Abujhmarh and North Bastar; Focus Shifts to South Bastar.
Sakal
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील अबूझमाडचे डोंगराळ जंगल तसेच उत्तर बस्तरचा भाग नक्षलवादापासून मुक्त झाला असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. अलीकडेच महाराष्ट्रात ६१ तर छत्तीसगडमध्ये २७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यापाठोपाठ छत्तीसगडमध्ये आज पुन्हा १७० नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली. या पार्श्वभूमीवर शहा यांनी नक्षलवाद्यांना कठोर शब्दात इशारा दिला आहे.