
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रक्तस्राव झाल्यानंतर घरातच मृत्यू
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Abuse of a minor girl) करण्यात आला. हंसखळी नावाच्या ठिकाणी वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी हा टीएमसी पंचायत सदस्याचा मुलगा आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. (Abuse of a minor girl)
मुलगी नववीत शिकत होती. घटनेच्या चार दिवसांनंतर पालकांनी हंसखळी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रिजगोपाल ऊर्फ सोहेल गयाली याला आधी ताब्यात घेण्यात आले. काल रात्री अटक करण्यात आली. त्याच्यावर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कायदेशीर हस्तक्षेपासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना टोला; म्हणाले, देशाचे पंतप्रधान आहेत की गावचे सरपंच
मुलगी वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. घरी परतल्यावर तिची प्रकृती बिघडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू (Abuse of a minor girl) झाला. मुलगी स्थानिक टीएमसी नेत्याच्या घरातून परत आली तेव्हा तिला रक्तस्राव होत होता आणि पोटात दुखत होते. तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. पार्टीत उपस्थित लोकांकडून माहिती घेतल्यानंतर मला खात्री आहे की आरोपी आणि मित्रांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला, असे आईने तक्रारीत म्हटल आहे.
पीडितेचे मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. काही लोकांनी आधी मुलीवर जवळच्या क्लिनिकमध्ये उपचार करून घेण्याची धमकी दिली होती. कोणत्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात नेऊ नका, असे म्हटल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
हेही वाचा: PM मोदींचा देशवासीयांना सावधानतेचा इशारा; ‘तो पुन्हा येतोय’
बाहुबली समरेंद्र गयालीचा मुलगा ब्रिजगोपाल पीडितेकडे आकर्षित झाला होता आणि त्याने तिला वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला सांगितले की, त्यांच्या मुलीची प्रकृती पार्टीदरम्यानच बिघडली होती आणि नंतर तिला स्थानिक दवाखान्यात नेले. राणाघाट येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मुलीचे कुटुंबीय, क्वॅक डॉक्टर आणि स्मशानभूमीतील परिचर यांचे जबाबही नोंदवण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी वेदनाशामक औषध दिले होते. मृत्यू प्रमाणपत्र दिले नाही. त्याचवेळी स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, अंत्यसंस्कार झाले तेव्हा तो तेथे उपस्थित नव्हता.
Web Title: Abuse Of A Minor Girl Death At Home After Bleeding Forced Cremation Crime News Bengal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..